Monday, October 25, 2021

सामाजिक बांधिलकी जपत कॉसमॉस इंग्लिश अकॅडमी तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन


लातूर.दी.२५ ऑक्टोबर २०२१. 

प्रा. अजय सुर्यकांत मस्के पाटील आणी ॲड. अण्णाराव भुसणे काका व कावेरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.असं रक्तदान शिबीर यापूर्वी कधी झालं नसेल! खाजगी कोचिंग क्लासेस मार्फत (कॉसमॉस इंग्लिश अकॅडमी लातूर)हे एकमेव रक्तदान शिबिर घेण्यात आले.गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबीर घेणे ही तशी नित्याची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र, खाजगी कोचिंग क्लासेस मार्फत हे लातूर मधील पाहिले च भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.आयोजित केलेलं रक्तदान शिबीर सध्या लातुरात चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याला कारणही तसंच आहे.रक्तदात्यांचे    सामाजिक दायित्व महारक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदात्यांनी सामाजिक दायित्व पार पाडले. कोरोनाची लस घेऊन ‘इतके दिवस लोटले, आता रक्तदान करता येईल का’, अशी विचारणा करून डाॅक्टरांनी होकार भरल्यानंतर अनेकांनी रक्तदान केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मंडळींनी शिबिरात सहभाग नोंदविला. एवढेच नव्हे तर महिला मंडळींनीसुद्धा रक्तदान केले. शिबिराला सुरुवात झाल्यापासूनच रक्तदात्यांनी मास्क लाऊन या शिबिरात सहभाग घेतला. शिबिराची वेळ संपेपर्यंत रक्तदाते याठिकाणी दाखल होत होते.

खालील रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सौरभ दत्ता पुदाले 

श्रेयश पल्ले 

संगीता राजेन्द्र माने 

रवि कैले 

अशिष आरदवाडे 

शिल्पा माळी

तेजस्विनी मुळे

अविनाश दंडीमे

अजय कतरे

Psi सुषेण दिवते

कृष्णा नालागूले

शुभंम सालमे 

चिन्मय पिटके

रंजना उम्बरे 

गोपाल ओझा, लातूर ब्लड  बॅंकेचे अधिकारी नयन पाटील त्यांची टीम ने सहकार्य केले त्या बद्दल प्रा. अजय सूर्यकांत मस्के पाटील सर संचालक कॅसमाॅस इंग्लिश अकॅडमी यांनी आभार व्यक्त केले

शिबिराच्या यशस्वीतेसाठी यांनी केले सहकार्य, प्रेरणा अण्णाराव क भुसने साहेब से.नी. कोषागार अधिकारी, ॲड शहुराज बेवणालकर, विमल मस्के, प्रा. रचना भागवत, नवनाथ गोरे, राहुल महलांगिकर,प्रा.रविराज भूसने,प्रा. एस.बी.मस्के (ग्रंथपाल राजश्री शाहू महाविद्यालय,लातूर) विद्यार्थी प्रतिनिधी

विश्वप्रसाद महादेव वाडेकर

पाटील सुमेधा दत्तात्रय,शर्मा वैष्णवी भवरलाल,जगळपुरे वैष्णवी मारुती,प्रथमेश कदम आदी उपस्थित